जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात आज स्वातंत्र्य युद्धात ज्या महापुरुषांनी योगदान दिले आहे अशा,वीरपुरुषांच्या इतिहासाला उजाळा देण्यासंबंधी व काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेसंबंधी,पोस्टरचे प्रदर्शन मावळा संघटनेने भरवले आहे. देशाच्या स्वातंत्र्यात ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपले जीवन समर्पित केले आहे,अशा वीर स्वातंत्र्यवीरांचे पोस्टरचे प्रदर्शन व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पोस्टरचे प्रदर्शन,एकत्रित आयोजित करण्यात आले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत देशभर दिलेला प्रेमाचा संदेश,मावळा संघटना कोल्हापूर यांना फारच प्रेरणादायी वाटला,शिवाय स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचा इतिहास,योगदानाचा इतिहास,जनतेस प्रेरणादायीक ठरावा, यासाठी आमच्या संघटनेने मिरजकर तिकटी येथे प्रदर्शन भरवले असल्याची माहिती,मावळा कोल्हापूर संघटनेचे अध्यक्ष उमेश पवार यांनी सांगितले.आमच्या मावळा कोल्हापूर संघटनेने भरवलेले प्रदर्शन हे,स्वातंत्र्याच्या युद्धात ज्या महापुरुषांनी योगदान दिले आहे,अशा वीर महापुरुषांच्या इतिहासाला उजाळा देण्याचे कार्य आमच्या संघटनेने केले आहे.याचा आम्हाला अभिमान असून,हा प्रदर्शनाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.