जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील प्रसिद्ध असलेल्या व नवसास पावत असलेल्या श्री गणरायाचा 244 वा रथोत्सव आज साजरा होणार आहे.दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील हजारो भक्त-भाविक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित राहणार आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी दुपारी 1:00 वाजता,श्री गणेशाच्या रथोत्सवाची सुरुवात होईल. तासगाव मधील प्रसिद्ध असलेल्या,नवसास पावत असलेल्या श्री गणेशाच्या रथोत्सवाची सुरुवात गणपती मंदिरापासून चालू होऊन,काशी विश्वेश्वर मंदिर पर्यंत जाऊन,परत श्री गणेश मंदिरापर्यंत येणार आहे.तासगाव मधील प्रसिद्ध असलेल्या श्री गणेशाच्या रथोत्सवास दूर दूर वरून,श्री गणेश भक्त- भाविक येत असतात.लाखोंच्या संख्येने भक्त- भाविक हजर राहून श्री गणरायाचा रथ दोरखंडाच्या साह्याने ओढत नेऊन, रथोत्सवाची यात्रा पूर्ण करत असतात.
तासगाव मधील श्री गणपती हा नवसास पावणारा असल्याने, लांब लांब हून भक्त- भावीक दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे,श्री गणरायाच्या सेवेस हजर राहत असतात.तासगाव मधील प्रसिद्ध असलेल्या श्री गणरायाचा आजचा होणारा रथोत्सव हा,महाराष्ट्रात अलौकिक स्वरूपात सोहळा होत असतो. दरम्यान आजच्या रथोत्सवाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे,तासगाव गणपती पंचायतन ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पटवर्धन (सरकार) यांनी सांगितले आहे.एकंदरीतच आजचा तासगाव मधील श्री गणरायाचा रथोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात,अलौकिक स्वरूपात पार पडणार आहे.