जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
केंद्र सरकारने साखरेचा साठा,दर आठवड्यास जाहीर करण्याचे,साखरेच्या व्यापाऱ्यांना,घाऊक व्यापाऱ्यांना, किरकोळ व्यापारांना अनिवार्य केले असल्याचे,अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने काल जाहीर केले आहे. सध्याच्या परिस्थितीतील बाजारपेठेतील साखरेची साठेबाजी थांबवण्याच्या दृष्टीने,केंद्र सरकारने वरील निर्णय घेतला आहे.
दरम्यान बाजारपेठेतील साखरेचे साठेबाजी करण्यावर प्रतिबंध व दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी,अनेक निर्णयांपैकी एक निर्णय असल्याची माहिती, काल ग्राहक कल्याण अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाने दिली आहे. देशात सर्वत्र साखर साखर नागरिकांना किफायतशीर दरात, उपलब्ध करून देणे हे फार मोठे उद्दिष्ट केंद्र सरकारने घेतले आहे. शिवाय यामुळे साखरेच्या साठेबाजी वर व साखरेच्या दरावर नियंत्रण ठेवणे, त्यामुळे शक्य होणार असल्याचे केंद्रीय ग्राहक कल्याण अन्न सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाचे म्हणणे आहे. देशातील साखरेच्या व्यापाऱ्यांना, घाऊक व्यापाऱ्यांना व किरकोळ व्यापाऱ्यांना Esugar.nic.in या संकेतस्थळावर ,दर सोमवारी साखरेच्या साठ्याची माहिती देणे अनिवार्य झाले आहे. एकंदरीतच आजचा केंद्र सरकारने साखरेच्या बाबतीत ठरवलेले धोरण हे, सर्वसामान्यांच्या हिताचे ठरेल यात मात्र तिळमात्र शंका नाही.