जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र सरकारने राज्यातील ओबीसी संघटनांची,मुंबईत 29 सप्टेंबर 2023 रोजी बैठक बोलावली असून,राज्यातील आंदोलनाची व्याप्ती पाहून निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व ओबीसी संघटनांना,मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी ठीक 2:00 वाजता बैठक बोलावली असून,राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रीमहोदय उपस्थित राहणार आहेत.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर होणाऱ्या बैठकीचे निमंत्रण राज्यातील ओबीसी संघटनांनी स्वीकारले असून,नागपूर शहरातील भारतीय जनता पार्टीच्या माजी आमदारांची नावे जारी करण्यात आलेल्या पत्रात दिसत आहेत,परंतु विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी मंत्री सुनील केदार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख,काँग्रेस नेते विकास ठाकरे यांना मात्र निमंत्रित करण्यात आलेले नाही. महाराष्ट्र राज्यातील सध्याच्या परिस्थितीत ओबीसी संघटनांनी जी आंदोलने केली आहेत,त्याची दूरगामी दृष्टी ठेवून,राज्य सरकारने मुंबईत 29 सप्टेंबर 2023 ला ओबीसी संघटनांची, सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावली आहे.सदरहू बैठकीत कोणते विषय चर्चेला येऊन,काय काय निर्णय होतात?हे पाहणे सध्य परिस्थितीत योग्य ठरेल.