जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेत, भारताने 4 विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीस पाचारण करून,न्युझीलंड संघाचा डाव 274 धावात गारद केला.त्यानंतर 274 धावांचे विजयी आव्हान,भारताने पाठलाग करून,48 षटकार 6 विकेट्स गमावून पूर्ण केले.
आजच्या विजयामध्ये भारताकडून विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली आहे.भारतीय संघाने 2003 नंतर हा पहिल्यांदाच न्युझीलंड विरुद्ध विजय मिळवला असून,भारतीय संघाकडून रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी अर्धशतकी शानदार भागीदारी करून सुरुवात केली.रोहित शर्मा 46 धावा वर असताना व शुभमन गील 26 धावांवर असताना बाद झाले. त्यानंतर आलेल्या विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी संघाच्या धावसंख्येस आकार देण्याचा प्रयत्न केला.पण श्रेयस अय्यर 33 धावांवर व के.एल.राहुल हे 27 धावांवर बाद झाले. त्यानंतर आलेला सूर्यकुमार हा ही फार काळ टिकू शकला नसून,तो 2 धावांवर बाद झाला.त्यानंतर आलेल्या रविंद्र जडेजा ने विराट कोहलीस भक्कम साथ देऊन,दोघांनीही भारतीय संघाच्या धावसंख्येस आकार देऊन,विजया समिप नेले.48 षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रविंद्र जडेजा ने विजयी धाव घेऊन,भारताच्या विजयावर केले.भारताकडून मोहम्मद शमीने 5 विकेट्स विकेट्स,कुलदीप यादव ने 2 विकेट्स, जसप्रीत बुमराह मोहम्मद सिराजने 1- 1 विकेट घेऊन, भारतीय संघाच्या विजयाला मोलाचा हातभार लावला.