जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
दि.22 ऑक्टोबर 2023 वार रविवार रोजी सांगली येथील के. सी. सी. हायस्कूल येथे शिक्षक समन्वय संघाचा शिक्षक जागर मेळावा संपन्न झाला.या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातून प्रचंड संख्येने अंशतः अनुदानित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक बंधू व भगिनी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे नवरात्र उत्सव सुरू असताना देखील महिलांनी प्रचंड उपस्थिती दाखवली कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक म्हणून लाभलेले प्रा.रत्नाकर माळी प्रा.एम.बी खरात प्रा.चंद्रकांत बागणे,सुनील शेंडे सर,भारत शिरगावकर सर,पाटील काळे सर,पवार सर,धायगुडे सर याचबरोबर इतर ही जिल्ह्यातील सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आजच्या शिक्षक समन्वय संघाच्या जागर मेळाव्यातून सर्व समन्वयकाने 30 ऑक्टोबर 2023 च्या आजाद मैदानातील आंदोलनात प्रचंड संख्येने सांगली जिल्ह्यातील सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांनी उपस्थिती दर्शवावी,व शंभर टक्के अनुदानाचा निर्णय झाल्याशिवाय कोणीही मैदान सोडणार नाही.असे सांगितले.
पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व महिला शिक्षिका 30 ऑक्टोबरच्या आझाद मैदानाच्या आंदोलनात उपस्थित राहतील अशी ग्वाही बंडगर मॅडम या महिला भगिनींने मांडली.यापूर्वीच्या आंदोलनामध्ये असलेली सांगली जिल्ह्यातून महिलांची व अंशतःअनुदानित शिक्षकांची आझाद मैदानातील उणीव इथून पुढे कधीही भासणार नाही याबाबत चिंतन करून सर्वांनी जागृतीने समन्वय संघावर विश्वास ठेवून 30 ऑक्टोबर च्या मैदानात हजर राहावे असे मुख्य समन्वयक प्रा. एम बी खरात सर यांनी मत मांडले त्याचबरोबर रत्नाकर माळी सर हे खास कोल्हापुर वरून सदर कार्यक्रमाला हजर होते त्यांनी 30 ऑक्टोबरच्या आझाद मैदानातील आंदोलनात कोणत्याही संघटनेचे लेबल न लावता केवळ आपण आपल्या पगारासाठी सर्व ताकतीने उतरावे असे मत मांडले पुढे चंद्रकांत बागणे सर आपल्या भाषणात म्हणाले की,मी शिक्षक आहे माझी जबाबदारी ओळखून मला माझ्या पगारासाठी आझाद मैदानात यावेच लागेल असे सांगितले.
शिक्षक परिषदेचे व पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार आदरणीय भगवान आप्पा साळुंखे पाटील हे ही या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांनीही सर्व ताकदीनीशी आझाद मैदानातील आंदोलनात शिक्षक परिषदेबरोबर मी स्वतः 30 ऑक्टोबर पासून आझाद मैदानाच्या आंदोलनात तन-मन धन या तिन्ही शक्ती लावून मैदानात उतरणार असून आपले आंदोलन हे निर्णायक झाले पाहिजे निर्णय घेतल्याशिवाय कोणीही मैदानातून माघार फिरायचे नाही असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वहिदा मगदूम मॅडम तर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये सरदार अजेटराव सर यांनी सांगली जिल्ह्यातील शिक्षक बंधू-भगिनींची 30 ऑक्टोबर च्या आझाद मैदानातील उपस्थिती 100% जास्त असेल असे प्रतिपादन केले,कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा माध्यमिक कृती समितीचे सचिव प्रमोद पाटील सर,अजेटराव सर,काळे सर व सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील प्रतिनिधीने खूप प्रयत्न केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अपार कष्ट घेतलेले प्रमोद पाटील सर अजेटराव सर व त्यांची टीम या सर्वांनी समन्वयकांचे आभार मानले व 30 ऑक्टोबर च्या आझाद मैदानातील आंदोलनात सर्व ताकदीनिशी आम्ही तयार आहोत, असे आश्वासन दिले.