जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात सध्या डेंगू च्या आजाराने हाहाकार माजवला असून, आळतेकर ग्रामवासीय यामुळे त्रस्त झाले आहेत.हातकणंगले तालुक्यातील आळते गावात अनेक रुग्णांना डेंगूची लागण झाली असून,यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे.आळतेकर ग्रामवासीयांनी वारंवार प्रशासनास सांगूनही लोकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नसल्याने,येत्या 2 ते 3 दिवसात आळतेकर नागरिक उग्र आंदोलन करतील असा इशारा आळते ग्रामपंचायतचे सदस्य जावेद मुजावर यांनी दिला आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात,अंदाजे 40 पेक्षाही जास्त लहान मुलांना डेंगूसदृश्य आजाराची लागण झाली असल्याचे दिसत असून,अंदाजे जवळपास 1000 पेक्षा जास्त लोकांना ही डेंगू सदृश्य आजाराची लक्षणे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना याबाबतीत वारंवार दूरध्वनी करूनही दखल घेतली जात नसल्याने,आळतेकर नागरिक येत्या 2 ते 3 दिवसात उग्र आंदोलन करतील असे आळते ग्रामपंचायत सदस्य जावेद मुजावर यांनी दिला आहे.जिल्हा प्रशासनाने याबाबतीत त्वरित लक्ष देऊन डेंगूसदृश्य आजारावर,योग्य ते नियंत्रण येण्यासाठी त्वरित उपाययोजना करून,आळतेकर ग्रामवासीयांना दिलासा द्यावा असे वाटते.