जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
आज राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये, राष्ट्रवादी महिला सांगली शहर जिल्ह्याची बैठक संपन्न झाली.
यावेळी जयंत पाटील यांनी महिला पदाधिकारी यांच्याशी सवांद साधत, पक्षाच्या वाढीबाबत मार्गदर्शन केले.आजची सांगलीतील राष्ट्रवादी महिला सांगली शहर जिल्ह्याची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज व युवक राष्ट्रवादी चे शहर जिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार , राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम, छाया जाधव,ज्योती अदाटे,संगीता हारगे,स्नेहल सावंत,पवित्रा केरीपाळे,राधिका हारगे,संध्या आवळे, विद्या कांबळे,संगीता जाधव,सुरेखा सातपुते,छाया पांढरे,सुरेखा हेगडे,प्रियांका तुपलोंढे,स्वाती शिरूर,रुपाली कारंडे, सुनीता जगधने, वैशाली धुमाळ आदी पदाधिकारी व महिला मोठ्या उपस्थित होत्या.