जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
नागपूर येथे महात्मा गांधी जयंती निमित्त येस हाॅस्पिटल दिघोरी व डॉ प्रकाश ढगे फॅन्स क्लब च्या वतीने २ ऑक्टोबरला सद्भावना पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.गांधीजींच्या वेशभूषेत मारोती ढोबळे व डेबुजी मेश्राम हे सर्वाचे आकर्षण होते.
पदयात्रा दिघोरी चौकातून- धन्वतरी नगर- गाडगेबाबा चौक-गणेशमुर्ती चौक -चिटनिस नगर बगीचा -दिघोरी चौक व नंतर येस हाॅस्पिटल येथे येऊन, पुढील कार्यक्रम घेण्यात आला. नागपूर येथे झालेल्या महात्मा गांधी जयंती निमित्त,सद्भावना पदयात्रे नागपूर मधील असंख्य नागरिक सहभागी झाले होते.
याप्रसंगी डॉ प्रकाश ढगे ह्यांच्याअध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून,परमेश्वर राऊत,प्रा.ज्योती ढगे,रामचंद्र बोडखे,शरद वानखेडे,प्रमोद गाडगे हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदन नागपूरे यांनी तर संचालन भारत रेहपाडे यांनी केले.आभारप्रदर्शन प्रा.ज्योती ढगे यांनी केले.कार्यक्रमापूर्वी सर्व नागरिकांना T-shirt वाटण्यात आले तर T-shirt वरील नंबरचे १० लकी कुपन्सला स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाऊराव ढोक,गजानन काळे,सुरेश धनजोडे,गुड्डू चौधरी,श्रीकांत कासुलकर,कविता घुबडे,कैलाश मलवंडे,गजानन चौधरी,विलास धनेवार,शंकर भोंगेकर,विद्याताई सोलापूरकर,एस् हाॅस्पिटल चे संचालक कपिल पटेल व डॉ प्रमेय ढगे यांचे सह कार्य लाभले.