जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कामगार सेल तसेच महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने,बांधकाम कामगार कार्यालय याठिकाणी, कामगारांच्या प्रश्नांबाबत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात सुरू आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मा.संजय बजाज यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन,कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या,तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील साहेबांना आंदोलनाच्या मागण्यांची माहिती देऊन, मुख्यमंत्र्याना तात्काळ कार्यवाही करणेस पत्रव्यवहार करणेत येईल,असे यावेळी नमूद केले.
यावेळी अमर निंबाळकर,राष्ट्रवादी कामगार सेलचे जिल्हाध्यक्ष विनायक हेगडे,इब्राहिम पेंढारी,अनिता पांगम,नितीन माने, अफजल मुजावर,डॉ.शुभम जाधव,महालिंग हेगडे,सुरेखा हेगडे,राहुल होरडगी,राजू कांबळे,अमित चव्हाण,विजय बसाटे, गौतम कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.