जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे, आमजाई व्हरवडे व कागल तालुक्यातील हळदवडेत,सकल मराठा समाजाने येणाऱ्या पुढार्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे आता सकल मराठा समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी पुढाऱ्यांना गावबंदी होण्याची,नजीकच्या काळात शक्यता वाटत आहे.सकल मराठा समाजाने कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील दोन गावांमध्ये व कागल तालुक्यातील एक गावांमध्ये,सर्वच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना गावात प्रवेश करण्यासाठी बंदी घालण्याचा निर्णय,सकल मराठा समाजाने घेतल्याने,मराठा समाजास आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत,या प्रश्नी तोडगा निघणे अवघड वाटते.
सकल मराठा समाजाने महाराष्ट्र राज्यातील सर्वच गावात, सर्वच पुढाऱ्यांना,आपल्या आरक्षणाच्या मागणीसाठी जर गावबंदी करण्यासंदर्भात पाऊल उचलल्यास,राज्यातील सर्वच भागात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जोर मिळेल असे एकंदरीत वाटत आहे.जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे,आज दुसऱ्या दिवशीही आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू आहे.एकंदरीतच यापुढे महाराष्ट्र शासन वरील मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात काय निर्णय घेते? हे बघणे विशेषतः हितावह ठरेल.