जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील वारकरी सांप्रदायातील प्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार ह. भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे आज वृद्धापकाळाने, पहाटे नवी मुंबईत निधन झाले असून,ते 88 वर्षाचे होते. नेरूळ इथल्या राहत्या घरी त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.आज दुपारी 3:00 पर्यंत नेरूळ इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात, त्यांचे पार्थिव,वारकरी संप्रदायातील भक्तांच्या अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.नेरूळ मधल्या स्मशानभूमीत सायंकाळी 4:00 वाजता,शासकीय इतमामात,वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे पूर्ण नाव नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे- सातारकर असे असून,त्यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 साली,साताऱ्यातील प्रसिद्ध वारकरी संप्रदायातील गोरे -सातारकर घराण्यात झाला.त्यांनी यापूर्वी वकिलीचे शिक्षण घेतले होते व त्यांच्या वारकरी संप्रदायातील घराण्यात गेले 3 पिढ्यात कीर्तनाची व प्रवचनाची परंपरा चालत आली आहे.देशातील वारकरी संप्रदायातला प्रमुख फड म्हणून,सातारकर घराण्याच्या फडाचे नाव घेतले जात असते. ज्येष्ठ प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी 1962 सालापासून कीर्तन व प्रवचनाला प्रारंभ करून,त्यांच्या रसाळ गोड वाणीने देशातील वारकरी सांप्रदायास एक प्रबोधनाची दिशा प्राप्त झाली आहे.आज पर्यंत ज्येष्ठ प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर,देशात व राज्यात अनेक ठिकाणी कीर्तनाच्या व प्रवचनाच्या माध्यमातून,आपल्या गोड रसाळ वाणीने,वारकरी समाजाच्या सांप्रदायास प्रबोधन केले आहे.ज्येष्ठ प्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचा अध्यात्मातील अभ्यास हा गाढा असून,त्यांच्या रसाळ गोडवाणीने वारकरी संप्रदायातील भक्त, किर्तन व प्रवचन व्यासंगी असलेले रसिक,मंत्रमुग्ध होत होते. आंतरराष्ट्रीयस्तरावर,देशस्तरावर व राज्यातील अनेक कानाकोपऱ्यात त्यांचे नांव,वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ प्रसिद्ध कीर्तनकार व्यक्ती म्हणून फार मोठ्या उत्तुंग शिखरावर पोहोचले होते.