शंभर वर्षे निरोगी जगण्याचा मंत्र :- वात, पित्त, व कफ दोष समप्रमाणात ठेवणे यालाच निरोगी म्हणतात.या गोष्टीत बिघाड झाला तर आजार उत्पन्न होतो, म्हणूनच आपली जीवनशैली थोडी बदलली तर त्याचे चांगले परिणाम आपल्या आयुष्यात लाभून, 100 वर्षे आपण निरोगी जगू शकतो.:--

0

 आरोग्य भाग-४

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

100 वर्षे निरोगी जगण्यासाठी खालील कृती वाचून आपल्या आचरणात आणावी.

१) सकाळी लवकर उठावे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर ४.३० ते ५.०० या वेळेत उठावे.

२) दात घासण्याआधी कोमट पाणी हळुवारपणे प्यावे म्हणजे तोंडातील सर्व लाळ पोटात जावी याप्रमाणे १- ३ ग्लास पाणी खाली बसुनच प्यावे. (अनेक रोग दूर होतात)

३) पाणी पिल्यावर पोटावर दाब पडतो आणि प्रातिर्विधी करुन घ्यावा.

४) त्यानंतर दात घासावे त्यामध्ये कडु निंबाची काडी,आंब्याची काड़ी,करंजेची काड़ी,बाभळीची काड़ी ई.किंवा कोणतेही स्वदेशी दंतमंजन किवा स्वदेशी पेस्ट वापरु शकता. (पंचगव्य दंतमंजन) दंत रोग दूर राहतात.

५) नंतर अंघोळ करावी शक्यतो थंड पाणी किंवा कोमट पाणी वापरावे. अंघोळ करताना गरम पाणी कधीच वापरु नये.

६) सकाळी ७.३० ते ९.३० च्या दरम्यान जठराग्नि सर्वात तेज असतो त्यावेळी पोट भरून जेवण करावे.जमीनीवर मांडी घालून बसुन शांतचित्ताने जेवणे आदर्श.(अन्न पचन उत्तम होते) जेवण नेहमी सूर्याच्या उपस्थितीतच करावे.

७) जेवणाच्या अगोदर ४५ मिनीट आणि जेवणानंतर १  तासाने पाणी  प्यावे. जेवताना एक ते दोन घोट पाणी प्यायला हरकत नाही.

८) सकाळी फळांचा ज्युस प्या.दुपारी दही ताक किंवा मठ्ठा प्या.आणि झोपताना देशी गाईचे दूध,देशी गाईचे तूप व हळद टाकुन प्या.

९) नेहमी पाणी पिताना हळुवार व खाली बसूनच घोट घोट पाणी प्यावे उभे राहून,गड़बडीने पाणी पिऊ नये.

(शरीराला दररोज लाळेची गरज असते.जेवताना थोड़ी लाळ पोटात जाते आणि बाकीची लाळ आपल्याला पाण्यातुनच शरीरात घालवावी लागते त्यासाठी पाणी घोट घोट करूनच प्या तसे केल्यास बरेच आजार दूर राहतात )

१०) नेहमी जेवण केल्यावर १० ते १५ मिनीटे वज्रासनात बसावे. दुपारी जेवण केले की वामकुक्षी (२० मिनीटे झोपावे) घ्यावी.आणि संध्याकाळी जेवण केल्यावर ३ तास झोपू नये व शतपावली करावी.

११) ॲल्युमिनियमच्या भांड्यातील भोजन तसेच पाणी कधीच पिऊ नये व काहीही खाऊ नये.ॲल्युमिनियम मधे बनवलेले जेवण करणे म्हणजे विष प्राशन करणे होय.

१२) भोजन करतांना नेहमी मातीच्या भांड्यांचा वापर करावा त्याबरोबर तांब्या,पितळाची भांडी पण वापरु शकतो.थोडक्यात ज्याचा वितळबिन्दु जास्त आहे अशीच भांडी वापरा. 

१३) झोपताना नेहमी आकाशाकडे डोळे असावे असेच झोपावे किंवा विष्णु मुद्रेत,आणि जमिनीशी जेवढा संपर्क तेवढे चांगले, पोटावर झोपु नये.

१४) मैदा,डालडा,वनस्पती तेल, पामतेल,बेकरीचे पदार्थ अजिबातच खावु नयेत.लाकडी घाण्याचे तेलच वापरा.(रिफाईन्ड तेल/ डबल रिफाईन्ड  विष आहे)

१५) सेंन्द्रिय गुळाचा वापर करावा. (साखरेत गंधक असल्यामुळे विष आहे)

१६) पचन लवकर होण्यासाठी जेवणानंतर थोडासा गुळ खावा.

१७) जेवण बनवण्यासाठी फक्त सेंधा मीठ वापरा. (समुद्री मीठ वैद्यकीय सल्लानेच घ्यावे)

१८) कमीत कमी ६ ते ७ तास झोप आरोग्यासाठी पुरेशी आहे.

१९) दररोज एक तास प्राणायाम,१५ मिनीट योगासने,व जेवढे जमेल तेवढे सूर्यनमस्कार करणे.

२०) प्राणायाम मात्र नियमित करणेच चांगले. 

२१) रोज न चुकता एक आवळा किंवा आवळ्याचा रस प्यावा.तसेच दुधी भोपळा,गाजर,बिट,मुळा,काकड़ी,कोबी यांचा वापर करावा.

२२) जास्त वेळ पाय सोडून बसणे टाळावे,जास्त वेळ उभे राहणे,जास्त वेळ ड्रायव्हिंग करणे टाळावे.त्यापेक्षा जास्त वेळ मांडी घालून बसावे,उकड़ु बसावे,ज्यामुळे आपले मणके व सांधे चांगले राहतील. 

२३) भारतीय रस म्हणजे उसाचा रस,कोकम सरबत,आवळा रस,लिंबू सरबत,फळांचा ज्युस हेच आपल्या शरीराला उत्तम पोषक आहेत. 

२४) भारतीय पोशाख घाला व तो सैल असावा,जास्त फिट टाईट नसावा. व शक्यतो पांढराच असावा.

२५) शरीराचे हे वेग आले की त्यांना रोखु नये.जर रोखले तर शरीरामध्ये ८४ प्रकारच्या व्याधि निर्माण होतात.

२६) कफ कधीच गिळू नये.

वरील नियमांचे जर पालन केले तर नक्कीच आपण जास्त वर्ष निरोगी जीवन जगू शकतो.

सदरहू लेख आरोग्य आणि समर्थ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून संपादन करण्यात येऊन, जनहितार्थ प्रसिद्ध करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top