जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशात व महाराष्ट्रात आज प्रकाशोत्सवाचा दीपावलीचा नरक चतुर्दशीचा दिवस,पहाटेच्या अभंग स्नानाने उत्साहात साजरा करण्यात आला.देशातील व महाराष्ट्रातील प्रकाशाचा सण असलेल्या दीपावलीचा प्रारंभ,आज नरक चतुर्दशीच्या पहाटे चंद्रोदयापूर्वी अभंग स्नान करून,ठिकठिकाणी साजरा करण्यात आला.देशात व महाराष्ट्रात घरोघरी विद्युत आकर्षक रोषणाई केलेली घरे,विविध आकर्षक रंगाने काढलेल्या रांगोळ्या,आकाश कंदील,पणत्या अशा विविध प्रकारच्या गोष्टींनी सजावट करून, दीपावली साजरी करण्यास सुरुवात झाली.
आज दीपावलीच्या नरक चतुर्दशी दिवशी नागरिकांनी,विविध फराळाचे पदार्थ,मिठाचे पदार्थ खाऊन,नवे कपडे घालून, देशात व महाराष्ट्रात सर्वत्र उत्साहाने साजरी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले आहे.देशातील व महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे सुद्धा,नागरिकांनी खचाखच भरून गेली होती व दर्शनासाठी ठीक ठिकाणी रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान दीपावलीच्या नरक चतुर्दशी दिवशी,लक्ष्मीपूजनाचे सुद्धा महत्त्व फार मोठे असून,आज देशात व महाराष्ट्रात लक्ष्मी पूजन,व्यापारी बाजारपेठेत व घरोघरी अतिशय उत्साहाने साजरे झाल्याचे दिसून आले आहे.
देशात व महाराष्ट्र राज्यात ठिकठिकाणी संगीत नृत्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून,दिवाळी सणाचा नरक चतुर्दशीचा पहिला पहाटेचा उत्सव साजरा करण्यात नागरिक दंग झाले होते.आज देशात व महाराष्ट्रात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापाऱ्यांचे नववर्ष सुरुवात होण्यासाठी,चालू वर्षाची खाते वही बंद करून,नवीन वह्यांचे पूजनही करण्यात आले आहे.देशात व महाराष्ट्रात आज प्रकाशोत्सवाचा दीपावलीच्या पहिला दिवस असलेल्या नरक चतुर्दशीचा उत्सव,फार मोठ्या आनंदात व उत्साहजनक वातावरणात साजरा झाल्याचे पहावयास मिळाले आहे.