जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
देशातील मध्य प्रदेश,राजस्थान,तेलंगणा,मिझोराम व छत्तीसगड निवडणुकीचा धक्कादायक सर्वेक्षण अंदाज जाहीर करण्यात आला असून,एबीपी- सी केलेल्या सर्वेक्षणानुसार ,5 राज्यांचा निवडणुकीचा सर्वेक्षणाचा अंदाज खालील प्रमाणे.-
१)मध्यप्रदेश-मध्ये एबीपी- सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, भाजप व काँग्रेसमध्ये सत्तेसाठी चुरस असून,काँग्रेसला 45 टक्के मते,भाजपला 42 टक्के व इतर पक्षांना 13 टक्के मते मिळू शकतात.मध्यप्रदेश विधानसभेच्या एकूण 230 जागांपैकी,काँग्रेसला 118 ते 130 जागा,भाजपला 99 ते 111 जागा,तर 02 जागा इतरांच्या वाट्याला मिळू शकतात.
२)छत्तीसगड- मध्ये एबीपी- सी वोटर ने केलेल्या सर्वेक्षणानुसार,काँग्रेसला 45 टक्के मते,भाजपाला 43 टक्के मते,इतरांना 12 टक्के मते मिळून,काँग्रेस 45 ते 51 जागेंवर, भाजप 36 ते 42 जागेंवर व इतर पक्षाचे उमेदवार 2 ते 5 जागेवर विजयी होण्याची शक्यता आहे.
३)राजस्थान - मध्ये काँग्रेसला 42 टक्के मते,भाजपला 45 टक्के मते व इतरांना 13 टक्के मते मिळण्याची शक्यता असून, राजस्थान विधानसभेच्या एकूण 200 जागांपैकी,काँग्रेसला 67 ते 77,भाजपाला 114 ते 124, तर इतर पक्षांना 5 ते 13 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
४)तेलंगणा- मध्ये काँग्रेसला 39 टक्के मते,भाजपाला,14 टक्के मते,बीआरएस ला 42 टक्के मते,तर इतर पक्षांना 6 टक्के मते मिळून,काँग्रेसला 43 ते 55 जागांवर,भाजपला 5 ते 11 जागांवर,बीआरएस ला 49 ते 61 जागांवर तसेच इतर पक्षांना 4 ते 10 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे.
५)मिझोराम- मध्ये एमएनएफ ला 36 टक्के मते, काँग्रेसला 30 टक्के मते, झेडपीएमला 26 टक्के मते व इतरांना 9 टक्के मते मिळून, एमएनएफ ला जवळपास 17 ते 21 जागांवर, काँग्रेसला 6 ते 10 जागांवर,झेडपीएमला 10 ते 14 जागांवर व इतरांना 2 जागांवर विजय मिळण्याची शक्यता,एबीपी- सी व्होटरच्या सर्वेक्षणात अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकंदरीतच देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये विजयाचा गुलाल कोणत्या पक्षाला लागणार? हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.