दिल्ली येथे केंद्रीय कर्मचारी आणि राज्य कर्मचाऱ्यांचा जुन्या पेन्शन साठी आक्रोश.!

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघ आणि राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना यांच्या नेतृत्वाखाली PFRDA बिल रद्द करा,आणि सर्वांना जुनी पेन्शन लागू करा या एकमेव मागणीसाठी दि.3 नोव्हेंबर 2023 रोजी दिल्ली येथील रामलीला मैदान येथे विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.या विराट मोर्चात सहभागी होण्यासाठी सांगली जिल्ह्यातून पी एन काळे,डी जी मुलाणी,गणेश धुमाळ,रवि अर्जुने,सतीश यादव,राजेंद्र कांबळे, रामभाऊ सावंत,बी.डी. शिंदे,एस.वाय.पाटील,भानुदास जाधव या व्यतिरिक्त सांगलीतून विविध खात्यातील संघटनेचे पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.अशी माहिती पुणे विभागीय सचिव पी एन काळे,यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.  

या देशव्यापी मोर्चात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व राज्यातील लाखो कामगार कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.  सर्वांना जुनी पेन्शन योजना जशी आहे तशी लागू केली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांना जागा दाखवू,असा निर्धार सर्वच राज्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी सरकारी उद्योगांचे आणि सेवांचे कंत्राटीकरण व खाजगीकरण करू नका,कामगार विरोधी कायदे रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा,रिक्त पदे सरळ सेवेने तात्काळ भरा,या मागण्यांचा सहभाग होता.महाराष्ट्राच्या वतीने बोलताना निमंत्रक विश्वास काटकर यांनी दि.8 नोव्हेंबर २०२३ रोजी माझे कुटुंब,माझी पेन्शन या शीर्षकाखाली सरकारी निमसरकारी,जिल्हापरिषद,शिक्षक,शिक्षकेतर कामगार - कर्मचारी आपल्या कुटुंबासह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने मोर्चा काढतील आणि त्यातूनही राज्य सरकारने निर्णय दिला नाही तर दि.14 डिसेंबर 2023 पासून राज्यात संस्थगित केलेला बेमुदत संप पुन्हा एकदा करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.यावेळी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक दगडे,गणेश देशमुख,सुरेंद्र सरतापे, अविनाश दौंड उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top