जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीतील नागरिकांना आरोग्याविषयी सर्व माहिती आणि वेगवेगळ्या हॉस्पिटल्स मधील उपलब्ध असणारी अत्याधुनिक सुविधा यांची माहिती मिळावी आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने 'सांगली आय.एम.ए. 'ने आरोग्यम स्वास्थ प्रदर्शन सामाजिक बांधिलकीच्या उद्देश्याने पूर्णपणे मोफत असे आयोजित केले आहे.या हेल्थ एक्स्पो मध्ये सांगलीमधील सुप्रसिद्ध अशा हॉस्पिटल्स नी आपली सेवा प्रदर्शित केली आहे,तसेच आरोग्याशी निगडित अशा वेगवेगळ्या हेल्थ सेक्टर ने या हेल्थ एक्स्पो मध्ये भाग घेतलेला आहे.पंतप्रधान आणि मुख्यमंत्री सहायता निधी,महात्मा फुले जनआरोग्य योजने विषयी माहितीपर स्टॉल्स उपलब्ध केले आहेत.डॉक्टरांना आवश्यक असलेली व हॉस्पिट्ल्सना लागणारी सामुग्री यांचीही उपलब्धता इथे आहे.
वेगवेगळ्या हॉस्पिटल्स नी आरोग्याविषयी मोफत शिबीरे दिनांक 16,17 डिसेंबर (शनिवार व रविवार ) 11ते 4 या वेळात आयोजित केली आहेत. 'डॉक्टर आपल्या भेटीला ' या सदरा खाली वेगवेगळे तज्ञ डॉक्टर दि.16,17 डिसेंबर (शनिवारी आणि रविवार) संध्याकाळी 5 ते 9 या वेळात समाजामध्ये आढळणाऱ्या सर्वसामान्य आजाराविषयी माहितीपर व्याख्याने व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याविषयी प्रश्नांचे व शंकाचे निरसन करणार आहेत.
सांगली आय.एम.ए. आयोजित या कार्यक्रमाला आपण सदिच्छा भेट देऊन सामाजिक बांधिलकीच्या उद्देश्याने सांगली आय.एम.ए. करत असलेल्या उपक्रमाला हातभार लावावा ही विनंती असे आवाहन करण्यात आले आहे.