जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त-सोशल मीडिया
छत्तीसगड राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून रविवारी विष्णुदेव साय यांची निवड,भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत झाली आहे.दरम्यान नवे मुख्यमंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातील झालेल्या विधिमंडळाच्या बैठकीत,विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची निवड झाल्यामुळे,नवे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांचा शपथविधी लवकरच होईल.छत्तीसगड मधील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात पक्षाने पाठवलेल्या निरीक्षकांनी म्हणजेच श्रीयुत अर्जुन मुंडा,सर्वानंद सोनवाल,दुष्यंतकुमार गौतम या निरीक्षकांनी आमदारांशी चर्चा करून,विष्णुदेव साय यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आहे.दरम्यान छत्तीसगड राज्याचे होणारे नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय हे कुंकूरीचे आमदार असून,आदिवासी समाजातील प्रभाव असलेले नेते आहेत.यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्षपद व एकदा केंद्रीय मंत्री पदही भूषवले आहे.
छत्तीसगडमध्ये सद्यपरिस्थिती पाहता आदिवासी समाजातून निवडून आलेले विष्णूदेव साय हे,पहिल्यांदाच मुख्यमंत्री होत आहेत. छत्तीसगड राज्याचे होणारे नवे मुख्यमंत्री हे राज्यातील, केंद्रातील विविध पदे भूषवलेले व अनुभवीत असलेले तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाते असलेले नेते होय.एकंदरीत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा,छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री म्हणून विष्णुदेव साय यांना निवडण्यात मोलाचा वाटा आहे असे समजत आहे.