मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचा मास्टर प्लॅन आखणार : श्री.राजेश क्षीरसागर.!-

0

- राजेश क्षीरसागर विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व : माजी परिवहन सभापती नियाज खान.

- शास्त्रीनगर जवाहर नगर अंतर्गत रस्ते व गटर्सच्या कामाचा शुभारंभ. 

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अजित निंबाळकर.)


लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या कामास प्राधान्य देणे, नागरिकांना न्याय देण्याच काम करण्याची शिकवण शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिली आहे. शिवसेनाप्रमुखांच्या विचारानुसारच शहरात विकास पर्व सुरु आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यास कोट्यावधींचा निधी मंजूर झाला आहे. जिल्ह्यातील बरेच प्रश्न,विकास कामे मार्गी लागली आहेत. कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातही भरघोस निधीची तरतूद करण्यात आली आहे.शहराचा विकास हाच ध्यास ठेवून कार्य सुरु असून,मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासाचा मास्टर प्लॅन आखणार असल्याचे प्रतिपादन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी केले.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून कोल्हापूर शहरातील शास्त्रीनगर चौक बस थांबा मागील पठाण घर ते तेंडुलकर घर गटर करणे या कामास रु.८ लाख १० हजार आणि शास्त्रीनगर - जवाहर नगर अंतर्गत मालवणकर घर ते कार्वेकर घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे या कामास रु.८ लाख ६ हजार इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास कामांचा शुभारंभ आज प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांनी, शहर वासियांना मुलभूत सोयी सुविधा पुरविणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहरास भरघोस निधी प्राप्त होत आहे.रस्त्यांसाठी रु.१०० कोटी,रंकाळा तलावास रु.१५ कोटी अशा प्रमुख विषयांसह अंतर्गत रस्ते, पाईप लाईन, ड्रेनेज, गटर, आदी मुलभूत सुविधांसाठी कोट्यावधींचा निधी मिळाला आहे.जनसेवेचे घेतलेले व्रत विकास कामाच्या माध्यमातूनही अखंडीत जोपासले जात असल्याचे सांगितले.

यावेळी बोलताना माजी परिवहन सभापती नियाज खान यांनी, जन विकास आणि शहर विकास हेच श्री.राजेश क्षीरसागर यांचे ध्येय असून, त्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते झटत आहेत. नागरिकांच्या प्राथमिक गरजा ओळखून तत्परतेने निधी दिला जात आहे. श्री.राजेश क्षीरसागर साहेब हे विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व करवीरवासियांना लाभले असून,प्रभागातील नागरिकांच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याचे सांगितले. 

यावेळी माजी नगरसेवक राजू हुंबे,जिल्हा नियोजन समिती सदस्य अंकुश निपाणीकर,शिवसेना उपशहरप्रमुख टिंकू देशपांडे,उपशहरप्रमुख अश्विन शेळके,उपशहरप्रमुख मंदार तपकिरे,रविकिरण गवळी,विभागप्रमुख क्षितीज जाधव,उदय घारवाडे,वैभव साळोखे,नजीर पठाण,वीरेंद्र पोळ,प्रवीण मालवणकर,दिलावर शेख,नंदकुमार कुडवे,फारूक सनदी, बापूसाहेब गवळी,मंगल गवळी,मालन पोवार,मीना कर्वे, शबाना सनदी,तेजस्विनी हंचनाळे,स्नेहल पोळ,अश्विनी हवालदार आदी भागातील नागरिक,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top