जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क
(अनिल जोशी)
तामिळनाडू राज्यात,पुढील दोन दिवस,काही जिल्ह्यांच्या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.तामिळनाडू राज्यात विरुधुनगर, थेनी,तेनकासी,कन्याकुमारी,तिरुनेलवेली,तुतीकोरीन, येलगिरी,कोइंम्बतूर,तिरुपुर,दिंडीगुल आदी जिल्ह्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली असून,तामिळनाडू राज्यात काही ठिकाणी गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस झाला असल्याचे वृत्त आले आहे.
तामिळनाडू राज्यातील तुतीकोरीन ठिकाणी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे रेल्वे रस्ते वाहतूक सेवेला मोठा फटका बसला आहे.तामिळनाडू विविध जिल्ह्यांच्या ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, काही ठिकाणी सेवा- सुविधांच्या पुरविणाऱ्या क्षेत्रामध्ये, मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण झाली आहे.