जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील कृषीभूषण अंकुश राजाराम पडवळे यांना,आज पर्यंत कृषी क्षेत्रात दिलेल्या कार्याच्या योगदान बद्दल मिळालेल्या पुरस्कारांविषयी आम्ही आज माहिती देत आहोत.
1. महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला पुरस्कार महाराष्ट्राचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांचे हस्ते कृषिभूषण(सेंद्रिय शेती)- २०१६ पुरस्कार दि,राज्यातील कृषीमंत्री सह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, शासनाचे वतीने सन्मानपत्र व रोख पन्नास हजार रुपये देऊन सहपत्नीक सन्मानीत करण्यात आले....
2. पद्मश्री आप्पासाहेब पवार ॲग्रीकल्चर ॲवार्ड हा पहिलाच "प्रयोगशील शेतकरी २०१६" पुरस्कार राज्यपाल श्रीनिवास पाटिल व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते रोख एक लाख रुपये व सन्मानपत्र,स्मृतीचिन्ह प्रदान.
3.केंद्रीय कृषी मंत्रालया मार्फत कृषी व फलोत्पादन क्षेत्रातील योगदानाबाबत देण्यात येणारा राष्ट्रीय कृषी पूरस्कार केंद्रीय कृषीमंत्री ना. नरेंद्रसिंह तोमर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सन - 2022
4. केंद्रिय कृषी व किसान कल्याण मंत्रालया अंतर्गत असनाऱ्या ICAR - IARI अंतर्गत देण्यात यृणारा IARI Innovative Farmer Award 2023 चा पुरस्कार केंद्रीय कृषी राज्यमंत्री ना.कैलाश चौधरी याँचे हस्ते पुसा कृषी विज्ञान मेळाव्यात दि, 4/3/2023 रोजी प्रदान करण्यात आला.
5.दै.ॲग्रोवन चा पहिलाच "पश्चिम महाराष्ट्राचा स्मार्ट फार्मर ॲवार्ड 2016"रोख पन्नास हाजार रुपये,मानपत्र,स्मृतीचिन्ह असा सन्मान.
6.जिल्हा परिषद,सोलापूर चा सन २०१२-१३ चा कृषीनिष्ठ पुरस्कार.
7.महाराष्ट्र सिंचन सहयोगचा सन २०१३ चा सिंचन मित्र पुरस्कार रोख दहा हजार रुपये,मानपत्र व स्मृतीचिन्ह.
8.कै.वसंराव काळे फौंडेशन,पंढरपूर यांचे तर्फे सन २०१४ चा वसंतराव कृषीभूषण पुरस्कार रोख दहा हजार रुपये,मानपत्र व स्मृतीचिन्ह सन्मान.
9.नव शक्ती मित्र मंडळ,पुणे तर्फे बळीराजा पुरस्कार रोख दहा हजार,स्मृतीचिन्ह .
10.वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठाण,पुसदचा आदर्श शेतकरी पुरस्कार,मानपत्र प्रदान.
11. दै.लोकमत व रिन यांचे तर्फे देण्यात येणारा जलसंर्धन ॲवार्ड-२०१७ पुरस्कार व स्मृतीचिन्ह जलसंधारण मंत्री ना राम शिंदे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हस्ते प्रदान.
12. ॲग्रीअॉरगँनीक रिसर्च फौंडेशन,नाशिक यांचा सन २०१५ चा कार्व्हर पुरस्कार व स्मृतीचिन्ह.
13. तेजश प्रकाशन,कोल्हापूर यांचा २०१६ चा शेती प्रगती कृषीभूषण पुरस्कार व मानपत्र.
14. अखिल महाराष्ट्र डाळिंब संघाचा सन २०१६ आदर्श शेतकरी पुरस्कार व स्मृतीचिन्ह.
15. पु.अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव कमिटी, पुणे यांचे तर्फे पुण्यश्लोक अहिल्यारत्न पुरस्कार स्मृतीचिन्ह.
16. सिध्दापूर फेस्टिव्हल,सोलापूर यांचा सन २०१६ बळीअंश पुरस्कार व स्मृतीचिन्ह.
17. भारतीय महाक्रांती सेना,पुणे याःचा शेती क्षेत्रातील कार्याबद्दलचा सन २०१६ चा बुध्दभुषण गौरव पुरस्कार व स्मृतीचिन्ह.
18. जनकल्याण फौंडेशन,सोलापूर याःचे तर्फे शेती कार्यातील कामाबाबत जनकल्याण गौरव पुरस्कार २०१८ सन्मानित करण्यात आले.
19. ॲस्पी फौंडेशन, मुंबई यांचे तर्फे देण्यात येणारा हॉर्टीकल्चर कँटगरी मधिल प्रोटेक्टेड कल्टीव्हिशन(ढोबळी मिरची) चा मानाचा आदर्श शेतकरी पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.
20. जय शिवराय कला,क्रिडा व सास्कृंतीक मंडळ, चोपडी(सांगोला) तर्फे शिवजयंती महोत्सव २०१८ मध्ये कृतीनिष्ठ शेतकरी सन्मान पुरस्कार देण्यात आले.
कृषीभूषण अंकुश राजाराम पडवळे यांच्या,पुढील कृषी क्षेत्रातील भावी कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा.