जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
पुण्यातील शिवनेरी येथे "हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे" दि. 17 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत आयोजित करण्यात आलेले आहे.महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंतीनिमित्त, पुणे जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागामार्फत,"हिंदवी स्वराज्य महोत्सवाचे" आयोजन करण्यात आलेले आहे.
पुण्यातील शिवनेरी येथे दि. 17 फेब्रुवारी 2024 ते 19 फेब्रुवारी 2024 पर्यंत 3 दिवसाच्या कालावधीत,"हिंदवी स्वराज्य महोत्सवा"मध्ये शिवकालीन महाराष्ट्राची संस्कृती, शिवकालीन इतिहासाची व घटनांची माहिती मिळणार असून,जुन्नर शहरात देखील कला,संगीत यासारखे सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
पुण्यातील शिवनेरी येथे "हिंदवी स्वराज्य महोत्सवास" राज्यातील शिवप्रेमी रसिकांनी,दुर्गप्रेमी रसिकांनी,पर्यटक रसिकांनी व सर्व नागरिकांनी उपस्थित राहून,"हिंदवी स्वराज्य महोत्सवात"सहभागी व्हावे असे आवाहन,राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
पुण्यातील शिवनेरी येथे "हिंदवी स्वराज्य महोत्सवात"3 दिवस भरपूर सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार असून, एकंदरीत शिवकालीन इतिहासकालीन घटनांच्या स्मृतीना उजाळा मिळणार आहे.