जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकंदरीत 5 उमेदवारांची घोषणा करण्यात आली असून,भारतीय जनता पार्टीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,माजी आमदार मेघा कुलकर्णी व डॉ.अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे, तसेच काँग्रेस पक्षाने चंद्रकांत हंडोरे यांना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेचे खासदार काँग्रेसचे कुमार केतकर,भारतीय जनता पार्टीचे प्रकाश जावडेकर,नारायण राणे,व्ही.मुरलीधरन,राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण, शिवसेनेचे अनिल देसाई आदींचा कार्यकाल संपुष्टात येत असून,6 राज्यसभेच्या जागांसाठी,वरील उमेदवारांची पक्षांतर्फे घोषणा करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्जाचा शेवटचा दिवस असून,अर्जाची छाननी शुक्रवारी होणार असून,दि.27 फेब्रुवारी 2024 रोजी आवश्यकता भासल्यास त्याच दिवशी मतदान होऊन, मतमोजणी होईल.