जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुरात जिल्हा प्रशासन व सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या माध्यमातून कोल्हापूर महासंस्कृती महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले असून दि.31 जानेवारी 2024 पासून ते दि.5 फेब्रुवारी 2024 पर्यंत,शाहू मिल येथे होत आहे. कोल्हापूर महासंस्कृती महोत्सव 2024 च्या पहिल्या दिवशी शाहीर खडके पार्टी लोककला मंडळ सावर्डे तालुका शाहुवाडी यांनी कार्यक्रम सादर केला असून,यामध्ये गवळण,गण,पोवाडे सादर करण्यात आले आहेत.महाराष्ट्राच्या पाऊलखुणा हा कार्यक्रम देखील आज सादर करण्यात आला आहे.
कोल्हापूर महासंस्कृती 2024 महोत्सवामध्ये सांस्कृतिक वारसा लागलेले भरपूर कार्यक्रम सादर होणार असून, राज्यातील सांस्कृतिक व इतिहासापासून चालत आलेल्या लोककलेची माहिती या महोत्सवातून,रसिक प्रेमींना लाभणार आहे.कोल्हापूर महासंस्कृती 2024 महोत्सवात, कलादालनासह खवय्यांसाठी विविध स्टॉलची उभारणी केली असून,यामध्ये कोल्हापुरी व्हेज व नॉनव्हेज पदार्थांचा समावेश आहे.
कोल्हापुरात होत असलेल्या कोल्हापूर महासंस्कृती 2024 महोत्सवामध्ये कोल्हापूरकर सहकुटुंबासह मनमुराद आनंद घेतील असे वाटते.