जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील महापुराचे नियंत्रण करणे व पुराचे पाणी अवर्षणप्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाकडे वळविण्याकरीता राज्य शासनाच्या असणाऱ्या "महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" महत्वाकांक्षी प्रकल्पावर आज शिक्कमोर्तब करण्यात आले.यासंबंधी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली.राज्याचे उप मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रकल्पास मंजूरी देवून हा प्रकल्प पुढील ३ वर्षात पुर्णत्वास येणार असलेचे सांगण्यात आले आहे,अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.
खासदार संजयकाका पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बॅंकेच्या जोलाथा वॅटसन,जार्क गॉल,अनुप कारनाथ,सविनय ग्रोव्हर या ४ सदस्यीय समितीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधीत क्षेत्रांना प्रत्यक्ष भेट देवून तेथील पुरपरिस्थितीचा व त्यामुळ्या झालेल्या नुकसानींचा सविस्तर आढावा घेतला होता.
आजच्या बैठकीमध्ये उप मुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक बॅंकेची समिती व राज्य शासनाचे मुख्य सचिव नितीन करीर,'मित्र' संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविणसिंह परदेशी तसेच विविध विभागांचे अप्पर मुख्य सचिव,प्रधान सचिव,वरिष्ट अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत "महाराष्ट्र रिझिलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्रॅम" महत्वाकांक्षी प्रकल्पावर शिक्कमोर्तब करण्यात आले.
या प्रकल्पाकरीता जागतिक बॅंकडून २३३८ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य प्रप्त होणार आहे.त्यामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधीत क्षेत्रातील लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या प्रकल्पासाठी ५ महीन्यांत सर्व सर्वेक्षण व मॉडेल स्टडी रिपोर्ट तयार होवून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाईल तसेच या प्रकल्पाच्या कामांकरीता नव्या व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकेला जाणार असल्याचेही या बैठकीत नमूद करण्यात आले,अशी माहिती खासदार संजयकाका पाटील यांनी दिली.