जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात सिमेंट काँक्रीटच्या जवळपास 6000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती करण्याचा निर्णय,काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्यातील पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची निर्मिती केली जाणार असून, राज्यातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यासाठी सुमारे 28 हजार 500 कोटी रुपयांच्या खर्चाला काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यात सिमेंट काँक्रीटच्या जवळपास 6000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीमध्ये राज्य सरकारचा सहभागा 30 टक्के असून,एम.एस.आय.डी.सी चा सहभाग 70 टक्के असणार आहे.सदरहू राज्यातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांचा प्राधान्यक्रम हा,सार्वजनिक बांधकाम विभाग निश्चित करणारा असून,त्याचा कालावधी जवळपास 2.5 वर्षांचा असणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील सिमेंट काँक्रीटच्या जवळपास 6000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या निर्मितीमुळे,गतिमान विकास साधण्यासह राज्यातील सर्वच सुविधेंच्यामध्ये फार मोठी मदत होणार असल्याचे स्पष्ट आहे.