शरीराच्या पित्ताशयात खडे का होतात.?यासंबंधी अत्यंत उपयुक्त माहिती.!--

0

आरोग्य भाग 41.

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

शरीरामध्ये उजव्या बाजूला यकृत असते.यकृताच्या खाली पित्ताची पिशवी असते.तिला पित्ताशय असे म्हणतात.यकृतात तयार होणारे पित्त या पिशवीतून लहान आतड्यात येते.स्निग्ध पदार्थाचे पचन होण्यासाठी पित्त आवश्यक असते.पित्ताशयात जंतूंमुळे दाह झाल्यावर बऱ्याचवेळा नंतर खडे तयार होतात.या खड्यांचे दोन प्रकार आहेत.कोलेस्टेरॉल ७० टक्क्यांच्या वर असलेले कोलेस्टरॉल खडे,हा पहिला व कोलेस्टेरॉल १० टक्क्यांहून कमी असलेले रंगद्रव्य खडे हा दुसरा प्रकार.

जंतूसंसर्गामुळे पित्ताशयात प्रथिनयुक्त पदार्थ तयार होतात (पेशी नष्ट झाल्यामुळे).या प्रथिनयुक्त पदार्थांच्या सहाय्याने मग इतर क्षार तेथे गोळा होतात व मग खडे तयार होतात.विषमज्वर झालेल्या रुग्णामध्येही कालांतराने पित्ताशयात खडे तयार होतात.चाळीशी ओलांडलेल्या दोन-तीन मुले झालेल्या,लठ्ठ स्त्रीमध्ये पित्ताशयातील खडे होण्याचे प्रमाण जास्त असते.

पित्ताशयात खडे झाले,तरी कित्येक वेळा कोणतेही लक्षण निर्माण होत नाही.मात्र काही वेळा ताप,खूप जीवघेणी वेदना,हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसून येतात.वेदना खूपच तीव्र व असह्य अशी असते.त्यामुळे ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.दवाखान्यात कळ थांबण्यासाठी मॉर्फीन किंवा पेंटोझोकेनचे इंजेक्शन देतात.काही औषधांचा वापर करून हे खडे विरघळवता येतात.परंतु पुन्हा खडे होण्याची शक्यता असतेच.

पित्ताशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया यात खूप उपयुक्त ठरते.पित्ताशय काढून टाकले,तरी व्यक्ती अगदी सामान्य आयुष्य जगू शकते.

डाॅ.अंजली दिक्षित व डाॅ.जगन्नाथ दिक्षित यांच्या पुस्तकातुन श्री संतोष सावंत सर यांनी संपादन करून,आम्हाला जनहितार्थ प्रसिद्ध करण्यास दिले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top