कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर, हिंदू जनजागृती समितीच्या वतीने,एक दिवस शिवरायांच्या सानिध्यातील मोहीम.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

छत्रपती शिवाजी महाराजांंच्या वृत्तीची तरुण पिढी निर्माण करण्यासाठी आणि तरुण पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने 17 मार्च या दिवशी ‘एक दिवस शिवरायांच्या सान्निध्यात’असा दृष्टीकोन ठेवून पन्हाळा गडावर एकदिवसीय मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.नरवीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन या मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.समितीचे श्री. प्रथमेश गावडे आणि कु.नयना दळवी यांनी सहभागी युवकांना पन्हाळा गडावरील विविध ऐतिहासिक ठिकाणे दाखवून तेजस्वी  इतिहासाची माहिती दिली.सहभागी युवकांनी गडावर स्वच्छता करत प्लास्टिकच्या बाटल्या गोळ्या केल्या.युवकांनी गडावर असलेल्या विश्‍वासराव गायकवाड आणि खंडेराव गायकवाड यांच्या समाधीची स्वच्छता केली,पुरातन अशा श्रीकृष्ण मंदिराची स्वच्छता केली.या मोहिमेत जिल्ह्यातील 40 युवक-युवती सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन तरुणांनी राष्ट्र-धर्म कार्यात झोकून द्यावे.!- आनंदराव काशीद.

या मोहिमेच्या समारोपप्रसंगी स्वराज्यासाठी प्रार्णापण करणारे वीर शिवा काशीद यांचे 13 वे वशंज आनंदराव काशीद यांनी युवकांना मार्गदर्शन केले.श्री.काशीद म्हणाले, ‘‘याच परिसरात पांडव अज्ञातवासात असतांना त्यांचे वास्तव्य होते.या गडावर भगवान श्रीकृष्ण आणि पांडव यांची भेट झाली आहे.पंचगंगा नदीमधील गुप्त असणार्‍या सरस्वती नदीचा उगम याचा गडावर होतो,त्यामुळे या गडाला कधीही पाण्याची कमतरता भासत नाही.छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची अखेरची भेट याच गडावर झाली.ज्या गडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वास्तव्य होते अशा गडाच्या भूमीला स्पर्श करायला मिळणे हे आपले भाग्य आहे.त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन तरुणांनी राष्ट्र-धर्म कार्यात झोकून द्यावे.’’

या प्रसंगी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमण विरोधीकृती समिती’चे श्री.बाबासाहेब भोपळे यांनीही युवकांना मार्गदर्शन केले.हिंदु राष्ट्र स्थापनेची प्रतिज्ञा घेऊन इतिहासाचा जागर करत मोहिमेचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top