जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीत सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार वतीने,प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्हयातील सर्व तालुक्यांचे सर्व महिला पदाधिकारी यांचे स्नेहसंमेलन घेण्यात आले .
महिला पदाधिकारी सर्व कार्यक्रम करत असताना संयोजक म्हणून, सर्व संयोजनात व्यस्थ असतात,आज स्नेहसंमेलनाच आयोजन करून,जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना सहभागी होण्याची संधी,यावेळी उपलब्ध करून दिली, प्रत्येक तालुक्याने एक सांघिक नृत्य करून सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे निटनेटके नियोजन सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीने केले.सर्व सहभागी स्पर्धकांना यावेळी आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या,तसेच हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे ही आयोजन,सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या कडून करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त, मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून व पक्षाचे चिन्ह तुतारी वाजवून,कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.आ.जयंतराव पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली,सांगली जिल्हा महिला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी नेहमी नवीन नवीन उपक्रम पार पाडत आहे.आज हा आगळावेगळा उपक्रम महिलांसाठी पार पाडण्यात आला असे महिला सांगली जिल्हाध्यक्षा सौ.सुश्मिताताई जाधव म्हणाल्या.या कार्यक्रमाचे उदघाटन माजी जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील,इस्लामपूर नगरच्या माजी नगराध्यक्ष अरुणादेवी पाटील,सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील,मिरज तालुक्याचे युवक नेते विज्ञान माने व सांगली जिल्हा डॉक्टर सेल अध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा परिषद सांगली च्या मा.सभापती मा.कमल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच यावेळी इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुष्पलता खरात यांचा,युवती शहराध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिपाली साधू यांचा, सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी महिला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या अनिता पाटील,मीनाक्षी आक्की,अलका माने यांच्यासह तालुकाध्यक्ष व प्रमुख महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.