जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात बहुतांश जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा तडाखा बसला असून,राज्यातील सर्व ठिकाणी तापमान 40°c च्यावर गेले आहे.मराठवाड्यात देखील तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.मध्य महाराष्ट्रासह कोकणात सर्व ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून,विदर्भात मात्र वादळी वाऱ्यासह गडगडाटाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
सध्या कोकण व मध्य महाराष्ट्रातील बहुतांशु भाग हा उष्णतेच्या लाटेने होरपळत असून,राज्याच्या आरोग्य खात्याने उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनास दिल्या आहेत.पूर्व विदर्भ पासून मध्य महाराष्ट्र- कर्नाटक -उत्तर केरळ पर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय झाला असून,राज्याच्या विविध जिल्ह्यात यामुळे हवामान ढगाळ होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील काही जिल्ह्यातील तापमान खालील प्रमाणे..
पुणे-41.3 अंश.
नांदेड-42.4 अंश.
सोलापूर- 43.7 अंश.
परभणी-42.8 अंश.
जळगाव- 42.2 अंश.
चंद्रपूर- 41.8 अंश.
नाशिक- 42.2 अंश.
छत्रपती संभाजीनगर 40.7 अंश.
ब्रह्मपुरी- 40.2 अंश.
सोलापूर 43.7 अंश.
अशा रीतीने महाराष्ट्र राज्यात काल सोलापुरात सर्वाधिक म्हणजे 43.7°अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, राज्यातील आरोग्य खात्याने ज्येष्ठ नागरिकांना,दुपारच्या उन्हाच्या वेळी बाहेर न जाण्याचा इशारा दिला असून, उष्माघातापासून जपण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात असे आवाहन केले आहे.