जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून महायुती पुरस्कृत शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटाने उमेदवार म्हणून संदिपान भुमरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. महाराष्ट्र राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघाचे मतदान शांततेने पार पडले आहे.
आज शिवसेनेच्या एकनाथराव शिंदे गटाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली असून,यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून व महाविकास आघाडी कडून माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे आता महायुती पुरस्कृत शिवसेना एकनाथराव शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे व महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे उमेदवार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात लढतीचा सामना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकंदरीतच छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील लढत ही अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघात आता शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशीच लढत होणार आहे.