जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्याच्या ठिकाणी पावसाची शक्यता असून,पावसासाठी लागणारी आवश्यक अनुकूल हवामान स्थिती सक्रिय झाली आहे.कर्नाटक व दक्षिण तामिळनाडू पर्यंत वाहणारे वारे खंडित होत असल्याने,कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने,राज्यात पावसासाठी आवश्यक अनुकूल असणारी हवामानस्थिती सक्रिय झाली आहे.
मराठवाडा व आसपासच्या भागावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून,राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसासाठी आवश्यक असणारी अनुकूल हवामान स्थिती सक्रिय झाली आहे.सिंधुदुर्ग,गोवा,रत्नागिरी,नांदेड,लातूर,सोलापूर सांगली, सातारा,कोल्हापूर आदी ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून,पुण्यात आज जांभूळवाडी, कोळेवाडी,आंबेगाव बुद्रुक आदी परिसरात पाऊस झाल्याचे वृत्त आहे.
सध्याची महाराष्ट्र राज्यात पावसाला अनुकूल असणारी स्थिती निर्माण झाली असून,राज्यातील काही जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.