जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ,आज सांगली शहरातील संजय नगर येथील वार्ड क्रमांक 9 व 11 येथे कॉर्नर सभेचे आयोजन केले होते.
आजच्या झालेल्या सांगली शहरातील संजय नगर येथील कॉर्नर सभेत,सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी,केंद्रातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारची गेल्या दहा वर्षातील कामे व विविध योजनांचा गोषवारा व लेखाजोगा सभेत विशद करून,देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना साथ देण्यासाठी,सांगलीतून महायुतीचे व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार संजय काका पाटील यांना प्रचंड मताधिक्क्याने निवडून देण्याचे आवाहन केले.यानंतर पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मार्गदर्शक शेखर इनामदार यांनी देखील,भारतीय जनता पार्टीच्या केंद्रातील सरकारची योजनांची व कामांची माहिती देऊन,भारतीय जनता पार्टीचे उमेदवार व विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
संजय नगर वार्ड 9 व 11येथे कॉर्नर सभेचे आयोजन केले असताना,सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा गाडगीळ,पश्चिम महाराष्ट्र समन्वयक मार्गदर्शक शेखर इनामदार,माजी आमदार नितीन राजे शिंदे,मुन्नाभाई कुरणे,अविनाश मोहिते,सुरज पवार,अर्जुन मलमे, बाळासाहेब फोंडे,प्रियानंद कांबळे,रूपालीताई अडसुळे, किरण रुपनर,सतीश फोंडे,गंगा ताई तिडके,प्रियांका दरिबा बंडगर,आयेशा शेख भाभी कार्यक्रमाचे आयोजक- श्रीकांत वाघमोडे,दरीबा बंडगर,दीपक भाऊ माने,सुजित काटे, विलास सर्ज,आनंद म्हारगुडे,संतोष रुपनर,रवींद्र शेंडगे आदी मान्यवरांसह भागातील नागरिक व बंधू- भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.