जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
कोल्हापुर लोकसभा मतदारसंघात इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना,छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी विजयी करा असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी आज मलिग्रे तालुका संपर्क दौऱ्यात केले आहे.
सध्या देशात संविधान मोडण्यासाठी,भारतीय जनता पार्टीकडून 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी जोराचे प्रयत्न चालू आहेत.भारतीय जनता पार्टीच्या कूटनीतीचा भाग हाणून पाडण्यासाठी,कोल्हापूर मतदार संघात छत्रपती शाहू महाराज यांना विजयी करा असे आवाहन संभाजी राजे छत्रपती यांनी केले आहे.
देशातील महापुरुषांचे विचार नाहीसे करण्याचा डाव सर्वसामान्यांनी हाणून पाडावा अन्यथा देशाला याची फार मोठी किंमत भविष्यात मोजावी लागेल असा इशारा त्यांनी दिला.कोल्हापुर लोकसभा मतदारसंघातील इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठी,आज संभाजी राजे छत्रपती यांनी मलिग्रे संपर्क दौऱ्याचे आयोजन केले होते.