जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांनी आज,सकाळी सांगली शहरातील वृत्तपत्र विक्रेते,माई घाट,आमराई,छत्रपती शिवाजी स्टेडियम,बापट मळा,त्रिकोणी बाग आणि फळ मार्केट इथे नागरिकांशी भेटून संवाद साधत त्यांच्याशी दिलखुलास अश्या गप्पा मारल्या.सांगलीकरांशी पहिल्यापासून जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबंध आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आणून दिली. त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी आश्वस्त केले.तसेच त्यांना येत्या ७ मे ला "लिफाफा" ह्या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
सांगली जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्याने सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी स्वतःला झोकून दिले असून,सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील हे सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व गावांत प्रचार दौरे करत असून,मतदारांशी सुसंवाद करून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
सांगली जिल्ह्यातील व शहरातील मतदारांचा अपक्ष उमेदवार विशाल दादा पाटील यांना सर्वत्र पाठिंबा मिळत असून,त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा त्यांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रचार काम करत आहेत.