सांगली रेल्वे स्थानकावर हुबळी- मुझफ्फरपुर एक्सप्रेस व हुबळी- ऋषिकेश एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांना थांबा देण्याचे मध्य रेल्वेला आवाहन;अन्यथा आंदोलनाचा इशारा.--सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगलीत हुबळी मुजफ्फरपुर एक्सप्रेस व हुबळी ऋषिकेश एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा नसल्याने,अंदाजे रू.20 लाख नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंच,सांगली रेल डेवलपमेंट ग्रुप,पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुप व सांगली चेंबर ऑफ काॅमर्स तर्फे त्वरीत या गाड्यांना सांगली स्टेशनवर थांबा देण्याची मागणी केली असून,अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा सांगली जिल्हा नागरीक जाग्रुती मंचने दिला आहे.

गाडी नं 07315/07316 हुबळी-मुझफरपूर एक्सप्रेस व गाडी नं 06225/06226 हुबळी-रिषिकेश एक्सप्रेस या दोन रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला नाही.मध्य रेल्वे पुणे विभागात,पुण्यानंतर नं.2 चे सांगली स्टेशन,सर्व गाड्यांना प्रति फेरी रू 80,000 ते रु 1.33 लाख एवढे प्रचंड मोठे उत्पन्न देत आहे.रेल्वे बोर्डच्या निकशानुसार रु 12,000 प्रति फेरी उत्पन्नाच्या निकषापेक्षा 10 पट उत्पन्न सांगली स्टेशन जास्त देत आहे.तरीही ज्या रेल्वे अधिकार्यांनी सांगली स्टेशनवर या गाड्यांना थांबा दिला नाही त्यांच्यावर रेल्वे बोर्डाने त्वरीत कारवाई करावी अशी मागणी सांगली जिल्हा नागरी जागृती मंचने केली आहे.

सांगली रेल्वे स्थानकावर महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात कायम दुज्याभावाची वागणूक मिळत असून, यापूर्वीही सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचासह सर्व रेल्वे संघटनांनी व रेल्वे प्रवाशांनी आंदोलने केली आहेत.अजूनही मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही.आज पुन्हा सांगली जिल्हा नागरिक जागृती मंच,सांगली रेल डेव्हलपमेंट ग्रुप,पश्चिम महाराष्ट्र रेल प्रवासी ग्रुप व सांगली चेंबर ऑफ कॉमर्स ने या गाड्यांना त्वरित थांबा देण्याची मागणी केली असून अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा दिला आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top