जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
वृत्त:-सोशल मीडिया.
केंद्रीय निवडणूक आयोगाने,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटास मशाल प्रचार गीतात असणाऱ्या जय भवानी व हिंदू या शब्दास आक्षेप घेणारी नोटीस पाठवली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चिन्ह असलेल्या मशाल याच्या प्रचार गीतामध्ये,हिंदू व जय भवानी असे धार्मिक शब्द वापरले असल्यामुळें,केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे व त्यानुसार गीतामधून हिंदू व जय भवानी शब्द वगळण्याची नोटीस आयोगाने पाठवली आहे.
दरम्यान प्रसंगी आम्ही न्यायालयाच्या दरवाजात जाऊ पण हे शब्द वगळणार नसल्याची भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, रविवारी मातोश्री निवासस्थानी पत्रकार परिषदेत जाहीर केली आहे.सदर मशाल प्रचार गीतामध्ये जय भवानी अशी घोषणाही असून,त्यातील जय भवानी या शब्दासही केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानी माता असून,महाराष्ट्राची ही एक अस्मिता आहे.त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हे शब्द काढणार नसल्याचे स्पष्टीकरण,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.धार्मिक चिन्हे व धार्मिक प्रतिमांचा वापर प्रचारासाठी करण्यास मनाई असल्याने,केंद्रीय निवडणूक आयोगाने हे दोन शब्द हटवण्याचे निर्देश दिले असून,त्याबाबत तशी नोटीस काढली आहे.