जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी-वैशाली कंगणे)
हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली येथील लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांनी अनुसूचित जमाती जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत हजर न केल्याने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संरपच पद अपात्र केले आहे.या निर्णयामुळे पटणकोडीली गावातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गावाचे लक्ष आता घडणाऱ्या राजकारणाकडे लागलेल आहे.
लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री दत्तात्रय कोळी यांच्या विरोधात रायगोंडा बापू डावरे रा.पट्टणकोडोली यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हा आदेश दिला आहे.हा निर्णय मान्य नसेल तर पुणे आयुक्ताच्यांकडे पंधरा दिवसांत अपील दाखल करायचे आहे.या पुढील निर्णय लोकनियुक्त सरपंच कोणता घेणार आहेत अशी चर्चा पट्टणकोडोली गावच्या कोपऱ्या कोपऱ्यामध्ये सुरू आहे.