जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी: गणेश माने.)
TATA MOTORS कंपनीचा बनावट स्पेअर पार्ट विक्री केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शामराव कुंडलिक घुगे वय-53,रा.शिराळ (टेंभुर्णी), ता.माढा जि.सोलापूर असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याबाबतची फिर्याद TATA MOTORS कंपनीचे तपास अधिकारी श्री.रेवननाथ विष्णू केकान वय-40,रा.रामटेकडी हडपसर पुणे यांनी दिली आहे.
TATA MOTORS कंपनीचे तपास अधिकारी श्री.रेवननाथ केकान यांनी आपल्या गुप्त बातमीदाराच्या मदतीने टेंभुर्णी ता.माढा,जि.सोलापूर या गावच्या परिसरातील माहिती घेतली असता मौजे शिराळ,(टेंभुर्णी) ता.माढा,जि. सोलापूर येथे पुणे ते सोलापूर जाणाऱ्या हायवे रोड लगत विशाल उद्योग समूह नावाच्या दुकानात शामराव घुगे हे TATA MOTORS या कंपनीचे DEF या पार्टची हुबेहूब नक्कल करून तयार केलेल्या बनावट मालाचा साठा करून विक्री करत असल्याचे रेवणनाथ केकान यांना समजले होते.
त्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस कारवाई होण्याकरिता श्री.केकान यांनी मा.पोलीस उपविभाग पोलीस अधिकारी करमाळा विभाग यांच्या कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला होता.त्या अर्जाची दखल घेऊन कारवाई करण्याकरिता टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना सूचना करण्यात आल्या होत्या.त्यानुसार वरील अर्जाची दखल घेऊन टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.कुलदीप सोनटक्के,व पो.ना.श्री.साठे यांनी दोन पंचासमक्ष दि. 13/1/2025 रोजी रेवणनाथ केकान यांना घेऊन छापा टाकला असता TATA MOTORS कंपनीचा DEF बनावट पार्टचा 56,000/- रुपयांचा साठा आढळून आला.
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी करमाळा विभाग यांच्या आदेशानुसार व टेंभुर्णी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.कुलदीप सोनटक्के व पो.ना.श्री.साठे यांनी केली आहे.
TATA MOTORS कंपनीचा DEF पार्ट बनवून विक्री केल्याप्रकरणी व त्याचा साठा बाळगल्याप्रकरणी शामराव कुंडलिक घुगे यांच्यावरती कॉपीराईट अॅक्ट 1957 चे कलम 51,63 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.