जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी- वैशाली कंगणे)
हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या आणि त्यावर उपाययोजना करण्याबाबत आज दि. 27 जानेवारी 2025 रोजी छत्रपती ग्रुप हुपरी शहर यांच्या वतीने प्रशासकीय अधिकारी हुपरी नगरपरिषद हुपरी यांना निवेदन देण्यात आले.हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.विशेषतः मुले,वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना अधिक धोका आहे.प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतलेल्या माहिती नुसार मागील काही महिन्यात गावातील भटक्या कुत्र्याने चावा घेतलेले पेशंट खूप वाढले आहेत.त्याची देखील सर्व माहिती आम्ही निवेदनाच्या मागील बाजूस जोडून नगरपरिषद ला दिलेली आहे.असे यावेळी छत्रपती ग्रुपच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.
यावेळी उपस्थित छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत,शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार,शुभम चोपडे,उमाजी लाड,संग्राम जाधव,कुणाल खोत,गावातील प्रतिष्ठित नागरिक साताप्पा गायकवाड (सरकार),प्रदीप चव्हाण,सोमनाथ नंदाळे,सूर्यकांत रावण,जितेंद्र पाटील याच बरोबर छत्रपती ग्रुप चे सहकारी पदाधिकारी उपस्थित होते.