जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(प्रतिनिधी- वैशाली कंगणे)
हुपरी नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक-१ मधील सिद्धार्थ नगर मधील ओढ्याचे सार्वजनिक नाल्याचे बांधकाम काँक्रीट मध्ये सुरू आहे.या ओढ्यातून येणारे पाणी जवळपास हुपरी शहरामधील 50% एमआयडीसी मधील केमिकल युक्त पाणी हे दलित वस्तीमध्ये या ओढ्यामुळे येणार आहे.या ओढ्यातील दूषित तसेच केमिकल युक्त पाण्यामुळे सिद्धार्थ नगर मधील लोकांच्या तसेच या ओढ्याच्या अगदी जवळ असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या लहान लहान मुलांच्या जीवास धोका उत्पन्न होत आहे.त्याची वारंवार माहिती हुपरी नगरपरिषदेच्या निदर्शनास आणून दिलेली आहे. मात्र नगर परिषदेने यावर कोणतीही कारवाई केलेली नाही उलट या ओढ्याचे सार्वजनिक नाल्याचे रात्रीचे बारा बारा वाजेपर्यंत काम सुरू केले आहे.
सिद्धार्थ नगर या दलित वस्ती मधील नागरिकांच्या तसेच शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असलेला असताना नगरपरिषद मात्र मुग गिळुन गप्प आहे.या नगरपरिषदेला अनेक समस्येचे निवेदन दिलेले असताना या निवेदनांना पत्रांना केराची टोपी दाखवली आहे.अशा या नगरपरिषदेच्या विरोधामध्ये हा सार्वजनिक नाला बांधकाम कायमस्वरूपी बंद करण्यासाठी सिद्धार्थ नगर मधील नागरिकांच्या माध्यमातून शनिवारी दि. 25 रोजी स्मशानभूमी सिद्धार्थ नगर हुपरी येते कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणाला हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नरळे तसेच हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक चौखंडे तसेच महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील धर्मवीर कांबळे,प्रणित मधाळे,अतुल कांबळे, हिरालाल कांबळे,रवींद्र कांबळे,मारुती शेवाळे,आदींनी भेट दिली आहे.
या उपोषणाला रणजीत कांबळे,हसरत कांबळे,अविनाश कांबळे, किशोर कांबळे,राहुल कांबळे,तसेच समस्त बौध्द समाज सिद्धार्थ नगर हुपरी बसलेले आहेत.