जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
प्रतिनिधि: (मिलींद पाटील)
पिंपळगाव खुर्द : 16 जून 2025 पासून शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होत असून या शैक्षणिक वर्षांतील पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव म्हणून संपूर्ण राज्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.त्याअंतर्गत विद्या मंदिर पिंपळगाव खुर्द ता.कागल या जिल्हा परिषदेच्या शाळेत मा.मनीषा देसाई मॅडम उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग ) जिल्हा परिषद कोल्हापूर या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके,गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यासोबत *एक पेड माँ के नाम* या उपक्रमांतर्गत मुलांच्या माता तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.आकर्षकपणे सजवलेल्या ट्रॅक्टर मधून विद्यार्थ्यांची मिरवणूक गाव भागातून मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.याप्रसंगी देसाई मॅडम यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.त्याचबरोबर उपस्थित विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी कानमंत्र देत बहुमोल असे मार्गदर्शन केले आणि स्वछ सुंदर शालेय परिसर,संगीतमय परिपाठ,विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेतील यश पाहून कौतुक केले व एकंदरीत शालेय कामकाजाबाबत व ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी श्री आर.एस.गावडे,पिंपळगाव खुर्दच्या सरपंच सौ.शितल नवाळे,उपसरपंच सदाशिव चौगुले,ग्रामपंचायत सदस्य श्री. जे डी कांबळे,शाळा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ.कविता तेलवेकर,उपाध्यक्ष भीमगोंडा मगदूम,शिक्षण तज्ञ श्री.भिवा आकुर्डे, सदस्य एकनाथ सातपुते.मुख्याध्यापिका सुनीता चव्हाण सर्व शिक्षक स्टाफ आणि ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. करसिद्ध अनुसे यांनी केले.