*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी )*
- मागील काही दिवस मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर ,कोकण तसेच राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस होत असून, नुकत्याच भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार ,येत्या चार ते पाच दिवसात, राज्यातील विदर्भात काही ठिकाणी तसेच कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागालगत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने, राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे .त्यामुळे विदर्भात काही ठिकाणी, विजांच्या कडकडाटासह तीन दिवस मुसळधार पाऊस तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यात, मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार कोकण मध्य- महाराष्ट्रातील घाट परिसरातील देखील काही भागात,पुढील पाच दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट चा इशारा देण्यात आला असून, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही काही ठिकाणी ,अति मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला आहे. कोकणात काही ठिकाणी ,अति मुसळधार वृष्टी होण्याचा पावसाचा अंदाज वर्तवला असून, मुंबईसाठी तर आज पासून तीन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तसेच विदर्भात पुढील तीन दिवस बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.