*सांगलीच्या जी.एस.टी. विभागाने 91 कोटी रुपयांचा महसूल गोळा करून, राज्यात व देशात नेत्र दीपक कामगिरी केली--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
सांगलीच्या जी.एस.टी. विभागाने जवळजवळ 91 कोटी रुपयांचा महसूल गोळा करून, राज्यातच नव्हे देशात नेत्र दीपक कामगिरी करून, वरचे स्थान पटकावले आहे. सांगलीच्या जी.एस.टी. विभागाच्या कामगिरीत गेल्यावर्षीपेक्षा पण 21 टक्क्यांनी वाढ दर्शवत आहे. सांगलीच्या जी.एस.टी. विभागाने, गेले वर्षभर जी.एस.टी.चा कर गोळा करण्यासाठी, अत्यंत नियोजनबद्ध नियोजन केले होते .सांगलीच्या जी.एस.टी. विभागाने, ऑक्टोंबर सन 2021 मध्ये जवळपास 75 कोटी रुपयांचा कर गोळा केला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेच्या बाबतीत जी.एस.टी. कर गोळा करणेबाबत, सांगलीच्या जी.एस.टी. विभागाने अत्यंत मोलाची नेत्र दीपक कामगिरी करून ,राज्याच्या तसेच देशाच्या तुलनेत कर संकलनाबाबतीत प्रचंड मोठी आघाडी घेतलेली आहे असे जी.एस.टी. विभागाकडून सांगण्यात आले आहे.