*सांगली- महाराष्ट्र शासनातर्फे स्वातंत्र्याच्या "अमृत महोत्सवी वर्षानिमित्त", "चला जाणूया नदीला", या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील येरळा- तीळगंगा नद्यांचे पुनरज्जीवन होणार--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी)*
महाराष्ट्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवावर्षानिमित्त," *चला जाणूया, नदीला* " या उपक्रमांतर्गत राज्यातील जवळपास 75 नद्यांचे पुनर्जीवन करण्यात येणार असून, सांगली जिल्ह्यातील *येरळा व तिळगंगा* या नद्यांचा यात समावेश आहे .सांगली -सातारा जिल्ह्यातील येरळा व तिळगंगा या नद्यांचा मार्ग दुष्काळी भागातून जात असल्याने, दुष्काळी भागास," *चला जाणूया, नदीला* " या उपक्रमा अंतर्गत मोहिमेचा फायदा होणार आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव येथून, सोलकनाथ टेकडीवरून येरळा नदीचा उगम होत असून, खानापूर तासगाव पलूस या तालुक्यातून जाऊन पुढे सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे येरळा नदी कृष्णानदीशी एकरूप होते. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील करमाळा येथे तिळगंगा नदीचा उगम होऊन , बऱ्याच नदीकाठच्या सर्व गावांना या नदीचा फायदा होतो. " *चला जाणूया, नदीला* " या उपक्रमांतर्गत, नद्यांना वारंवार भेडसावणाऱ पूर, दुष्काळ आधी गोष्टींच्यावर उपाययोजना करण्यासाठी भर दिला जाणार आहे. राज्य शासनाने " *चला जाणूया, नदीला"* या उपक्रमांतर्गत 75 नद्यांचा मूलभूत अभ्यास, नद्यांचे स्वास्थ्य, मानवी जीवन आधारित उपाय योजना, नद्यांच्या पाणलोट क्षेत्रांचे अभ्यास, जमिनीखालील पाण्याचा म्हणजेच भूजलस्तर वाढण्यासाठी उपाययोजना, पावसाचे पाणी नदीच्या क्षेत्रात ठिकठिकाणी अडवण्यासंबंधी उपाय योजना, नदीक्षेत्रात झालेली अतिक्रमणे नद्यांचे झालेले प्रदूषण, नद्यांच्या परिसरातील पिकांची माहिती आदी गोष्टींवर अद्ययावत मूलभूत उपाययोजना करण्यात येणार आहेत. राज्य शासनाच्या मार्फत प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असून, जलसंपदा, जलसंधारण ,वनीकरण, भूजल, सांस्कृतिक कार्य आदी विभाग एकमेकांशी जोडले जाऊन, योग्य ती माहिती संकलित केली जाणार आहे. भारत देशाच्या अमृत महोत्सवही वर्षा निमित्य 75 नद्यांचे पुनरज्जीवन करण्याचा मानस, राज्य शासनाने केला आहे .यासाठी जलतज्ञ डॉ. ३ राजेंद्र सिंह राणा यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग करून घेऊन, त्यांच्या जलबिरादारी या सामाजिक संस्थेचा मुख्यत्वे सहभाग असणार आहे.