*सांगली- भारतामधील महिलांसाठी आदर्श ,आदरणीय, प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आंध्रप्रदेशातील विशाखापटणम् जिल्ह्यातील 95 वर्षीय प्रा. डॉ. शांतम्मा.*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
भारतामधील आंध्र प्रदेशामध्ये विशाखापटणम् जिल्ह्यातील 95 वर्षीय *प्राध्यापक डॉ.शांतम्मा* ह्या अखंड भारतामध्ये महिलांसाठी आदर्श, आदरणीय, प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्व होय. त्यांचे दोन्हीही गुडघे शस्त्रक्रियेद्वारे बदलण्यात आले असून, त्या हाताच्या काठीच्या सहाय्याने चालतात आणि कुठेही जातात .त्या रोज चालत विजयानगरम येथील सेंचुरियन यूनिवर्सिटीच्या वर्गात जाऊन, प्रोफेसर म्हणून वैद्यकीय भौतिकशास्त्र ,रेडिओलॉजी, अॅनेस्थेशिया विषय शिकवतात. त्यांनी आंध्र विद्यापीठातील एव्हीएन कॉलेज येथून बीएससी व एमएससी (ऑनर्स) मध्ये इंटरमिजिएटचे शिक्षण घेतले होते. सन 1947 मध्ये त्यांनी *पी.एच.डी* . पूर्ण करून, ज्या सालात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्याच वर्षी त्या आंध्र विद्यापीठात *लेक्चरर* म्हणून रुजू झाल्या .तेव्हापासून आजतागायत शांतम्मा अध्यापन व संशोधन करत आहे. विद्यार्थीदषेत असतानाही शांतम्मा यानी ब्रिटिश रॉयल सोसायटीच्या मार्गदर्शनाखाली " *डॉक्टर ऑफ सायन्स"* पूर्ण करणाऱ्या पहिल्या महिला म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी डॉक्टर रंगधामा राव यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधनात्मक पीएचडीचा अभ्यास केला .शांतम्मा यांचे संशोधन लेझर तंत्रज्ञान, इंधन भेसळ शोधणे यासारख्या अनेक विषयांमध्ये विस्तारलेले आहे .त्यांचे अनेक शोधनिबंध ही प्रकाशित झाले असून यु .एस., यु.के., दक्षिण कोरिया यासारख्या अनेक विद्यापीठानी त्यांचे अनुभव जाणून घेण्यासाठी यापूर्वी आमंत्रित केले होते. प्राध्यापक डॉ .शांतम्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या 17 विद्यार्थ्यांनी पी.एच.डी. चे शिक्षण पूर्ण केले आहे. सन 1989 मध्ये भौतिकशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून शिकवत असताना, त्या निवृत्त झाल्या .त्यानंतर आज तागायत अखंडपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचे कार्य चालूच आहे. आंध्र विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू सिंहाद्री यांनी त्यांना मानधनावर प्राध्यापक म्हणून काम करण्यास घेतले. विशाखापटनम येथील या महिला प्राध्यापक व्यक्तीने, दृढ निश्चय करून निवृत्तीनंतर वय हा अडथळा नाही हे प्राध्यापक डॉ. शांतम्मा यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी भगवद्गीतेचाही अभ्यास करून, भगवद्गीतेचा तेलगू मध्ये अनुवाद केला आहे. वैदिक मठातील 29 सूत्रावरही त्यांनी संशोधन केल्यानंतर सात खंड प्रसिद्ध केले आहेत शिवाय कर्करोगाच्या रुग्णांना आराम देणारी औषधे विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांचे काम उल्लेखनीय चालू आहे . लवकरच त्यांचे नाव, जगातील वयोवृद्ध प्राध्यापिका म्हणून, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. सध्या त्या 90 व्या दशकाच्या मध्यात, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रवेश करण्याच्या तयारी मग्न आहेत. हे विशेष उल्लेखनीय म्हणावे लागेल. *प्राध्यापक डॉ. शांतम्मा या एक भारतातील आदरणीय ,आदर्श, प्रेरणास्थान असलेले व्यक्तिमत्व होय*