दुबईत कोल्हापूर–महाराष्ट्राचा सन्मान! ‘VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड’मध्ये मान्यवरांचा गौरव.!-

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

कोल्हापूर आणि महाराष्ट्रातील मान्यवरांनी दुबईच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपला ठसा उमटवत राज्याचा मान उंचावला. दुबईतील हॉटेल सिटीमॅक्स, बर येथे गार्गीज डीआयडी फाउंडेशन व बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य “VVIP दुबई इंटरनॅशनल ब्रँड आयकॉन अवॉर्ड” सोहळा उत्साहात पार पडला. भारतातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलेल्या व्यक्तींना या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात कोल्हापूर–महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचा विशेष सन्मान झाला. सामाजिक क्षेत्रातील दशरथ तूपसुंदर, राजेंद्र नाईक, बाबुराव कांबळे, अश्विनी कटके आणि रोहिणी नाईक, वनसेवा क्षेत्रातील अमित कटके, शैक्षणिक क्षेत्रातील सौरभ नाईक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मीहीर नाईक नृत्य क्षेत्रातील प्रसाद कमतनुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यवर – रशियाचे एरिया व्हेरिटोना शास्त्रज्ञ, जर्मनीतील प्रा. मार्टिना मारिया, रशियाचे ॲलेक्स व्हेरीटोना आणि जपानचे मास्टर चिंगफुल चाव यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन गार्गीज डीआयडी फाउंडेशन व बिग मॅडी वेल्फेअर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मॅडी तामगावकर यांनी केले होते. आयोजनात सीओन कंपनीचे डायरेक्टर संदीप सोदडे, विजय सोदडे आणि राजेंद्र नाईक यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मान्यवरांच्या वतीने दशरथ तूपसुंदर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा कोल्हापूर व महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरला. दुबईच्या व्यासपीठावर मिळालेल्या या सन्मानाने समाजसेवा, शिक्षण, वैद्यकीय आणि वनसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूरकरांची कीर्ती दुमदुमली.

Tags

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top