*कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात सूर्यकिरणांच्या किरणोत्सवांचा चरण स्पर्श* ---
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
*(अनिल जोशी)*
कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात, दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे सूर्यकिरणांच्या किरणोत्सवाला आरंभ झाला असून, एकंदरीत देवी भक्तांसाठी ,पाच दिवस हा सोहळा संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे आज सूर्यकिरणांच्या किरणोत्सवानी दुपारी ०४ वाजून ५९ मिनिटांनी महाद्वाराच्या प्रवेशद्वारा जवळ प्रवेश करून, सायंकाळी ०५ वाजून ४६ मिनिटांनी, करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पदस्पर्श संपन्न होऊन, मूर्तीच्या डावीकडे किरणोत्सवाची सांगता झाली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील मंदिर देवस्थान समितीने, तीन ठिकाणी मोठे एलईडी स्क्रीन लावले असून, देवस्थान समितीने थेट सोहळ्याचे रोजच्या रोज प्रक्षेपण प्रसारित केले जाणार आहे .करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर देवस्थान समितीने हा सोहळा पाच दिवस होणार असल्याचे दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे जाहीर केले आहे. काही खगोलशास्त्रीय अचानक झालेल्या बदलांमुळे, दरवर्षींच्या तारखांमध्ये सर्वसाधारणपणे थोडा बदल संभावित आहे.