*सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतच्या बाबतीत ,राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर--*
*जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क*
( *अनिल जोशी* )
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने, नुकताच सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी बाबतीत, सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, संबंधित ग्रामपंचायतच्या तालुक्यात, आचारसंहितेची अंमलबजावणी आज पासूनच सुरुवात होत असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदन यांनी केली .सांगली जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतीची मुदत ही जवळपास ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ पर्यंत संपत असून ,यामध्ये वाळवा तालुक्यातील ८८, मिरज तालुक्यातील ३८, तासगाव तालुक्यातील २६,जत तालुक्यातील ८१, आटपाडी तालुक्यातील २६, कडेगाव तालुक्यातील ४३, कवठेमंकाळ तालुक्यातील २९, खानापूर तालुक्यातील ४५, पलूस तालुक्यातील १६ ,शिराळा तालुक्यातील ६० या मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रमात समावेश आहे. या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्ताने, राजकीय वातावरण तापणार असून, जिल्ह्यासाठी ४५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे ,संबंधित तालुक्यात आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, उमेदवाराने अर्ज भरण्याचा कालावधी २८ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर असून ,सकाळी ११:०० ते दुपारी ३:०० या नमूद केलेल्या वेळेत असेल. अर्जांची छाननी ०५ डिसेंबर सकाळी ११:३० ते छाननी संपेपर्यंत होणार असून, अर्ज माघारीची मुदत ०७ डिसेंबर दुपारी ३:०० वाजेपर्यंत आहे, तसेच ०७ डिसेंबर दुपारी ३:०० नंतर उमेदवारांची यादी व त्यांना दिलेले चिन्ह जाहीर करण्यात येऊन, मतदान १८ डिसेंबर २०२२रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून सायंकाळी ५:३० पर्यंत ठेवण्यात आलेले आहे. मतमोजणीची तारीख २० डिसेंबर२०२२ रोजी ठेवण्यात आली आहे. एकंदरीतच जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकी वेळी, प्रचारांचा धुरळा उडणार असून, राजकीय आरोप एकमेकांच्या वर केले जाण्याची शक्यता आहे.