बिंदू चौक परिसरातील विकास कामांना गती. सामाजिक कार्यकर्ते अजित पवार यांच्या पाठपुरावाला यश.
जनप्रतिसाद न्यूज: मयूर कांदळकर.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट स्वरूपाची झाली असून सर्वसामान्य नागरिकांना या समस्या सदैव भेडसावत आहेत. पण या समस्यावर उपाय योजनेचे काम कुणीही करण्यास तयार नाही. पण याला अपवाद म्हणजे दत्त गल्लीमधील विकास कामाचे उद्घाटन होय.
सामाजिक कार्यकर्ते मा. अजित पवार शिवांजनी फाउंडेशन यांच्या पुढाकाराने विकास कामाचे आयोजन करण्यात आले होते. दत्त गल्ली लक्ष्मी गल्ली येथील गटारीचे काम कसबा गेट ते जैन मंदिर येथील रस्त्यांचे रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन अजित पवार व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे हस्ते करण्यात आले.
मा.आमदार स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांच्या फंडातून संयुक्त आजाद गल्ली, हुजूर गल्ली, आराम कॉर्नर राजाराम रोड प्रभाग क्रमांक 32 च्या अधिकृत उमेदवार सौ. सरिता अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दत्त गल्ली व लक्ष्मी गल्ली येथील लोकांनी शिवांजनी फाउंडेशनचे अजित पवार यांचे आभार मानले.